पिंपरी – सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 31) एकही बाधित रुग्ण आढळला नाही. तुलनेत सहा रुग्ण बरे होऊन घरी परतले. ही बाब दिलासादायक ठरली आहे. रुग्णालयात वाकड, न्हावरा, लोणीकंद, पिरंगुट, मंचर, तळेगाव दाभाडे येथील उपचार घेत असलेले 6 रुग्ण बरे झाले. त्यांना आज घरी सोडण्यात आले. त्यामध्ये 5 पुरुष आणि एक महिला रुग्णाचा समावेश आहे.
रुग्णालयामध्ये सध्या 25 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 14 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आतापर्यंत 1 हजार 345 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 354 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे. तर, 2 हजार 49 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. एकूण 343 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.