चंदीगड – पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे आणखी 18 लोकांचा मृत्यू झाल्याने मरणाऱ्यांची एकूण संख्या 104 झाली आहे. 18 पैकी 17 जण तरनतारन या जिल्ह्यातील आहेत. तर एक व्यक्ती गुरुदासपूरमधील बटाला येथील आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्विट करून सांगितले की, विषारी दारू प्यायलामुळे मरणाऱ्यांची संख्या 104 झाली आहे. यापैकी तरनतारन येथील 80 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर गुरदासपूरमधील बटाला आणि अमृतसर येथील प्रत्येकी 12 लोकांचा मृत्यू झाला आहे.
तीन जिल्ह्यांपैकी तरनतारन या जिल्ह्यातील मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पंजाबातील या तीन जिल्ह्यांत बुधवारच्या संध्याकाळपासून सुरू झालेली ही मृतांची मालिका शनिवारपर्यंत 86वर येऊन पोहोचली होती.