लॉकडाऊननंतर आकडा 12 ने घटला
पुणे – शहराच्या हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या कमी झाली असून, आधी ती संख्या 87 होती, ती आता 12 ने कमी होऊन 75 झाली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी या प्रतिबंधित क्षेत्राची यादी जाहीर केली.
ज्या ठिकाणी करोना बाधितांची संख्या जास्त आहे तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून त्याठिकाणी पत्रे लावण्यात आले आणि नागरिकांच्या चलनवलनावर निर्बंध लावण्यात आले. मात्र, या क्षेत्राबाहेरही बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे दि.13 ते 23 जुलै काळात पुन्हा शहर लॉक करण्यात आले. याचा फायदा झाला असून यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या कमी झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. लॉकडाऊनपूर्वी शहरात 109 प्रतिबंधित क्षेत्रे होती. यातून 22 क्षेत्र वगळून ती 87 झाली होती. त्यात आता 12 ने घट झाली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नगररोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक 11 प्रतिबंधित क्षेत्र असून, त्यानंतर ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत 8, तर सर्वांत कमी प्रतिबंधित म्हणजे प्रत्येकी 1 प्रतिबंधित क्षेत्र कोंढवा आणि औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आहे. याशिवाय हडपसर मुंढवा, येरवडा-कळस-धानोरी, वारजे-कर्वेनगर, कोथरूड-बावधन या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र आहेत.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या
– नगररोड-वडगावशेरी 11
– शिवाजीनगर-घोले रस्ता 08
– हडपसर-मुंढवा 07
– ढोले पाटील 06
– येरवडा-कळस-धानोरी 06
– वारजे-कर्वेनगर 06
– कोथरूड-बावधन 06
– कसबा-विश्रामबाग 05
– वानवडी-रामटेकडी 05
– बिबवेवाडी 04
– भवानी पेठ 03
– धनकवडी-सहकारनगर 03
– सिंहगड रोड 02
– कोंढवा-येवलेवाडी 01
– औंध-बाणेर 01