देशाला चार राजधानी असाव्यात; ममता बॅनर्जी यांची भूमिका

कोलकाता – देशाची राजधानी केवळ दिल्लीतच न ठेवता पूर्व, पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर भारतातील शहरांतही देशाची राजधानी असावी, असे सांगून कोलकात्यालाही देशाची राजधानी बनवले जाण्याची मागणी तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने कोलकात्तामध्ये आयोजित सभेत त्या बोलत होत्या.इंग्रजांनी कोलकात्त्यात बसून संपूर्ण देशावर राज्य केले. मग आपल्या देशात राजधानीचे शहर एकच का? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला.

नियोजन आयोगाची पूनर्स्थापना करण्याची मागणी करत त्या म्हणाल्या, मोदी सरकारने नियोजन आयोग रद्द करुन, त्या जागी निती आयोग आणला. निती आयोग आणि नियोजन आयोग एकत्र राहू शकतात. केंद्राने नियोजन आयोगाची पूनर्स्थापना करावी, नियोजन आयोग ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची संकल्पना होती. त्यामुळे आयोगाची पुन्हा स्थापना करावी, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

नेताजींनी जेव्हा भारतीय राष्ट्रीय लष्कराची स्थापना केली, तेव्हा त्यांनी गुजरात, तामिळनाडू, बंगाल सर्व भागातून लोकांना सामावून घेतले. ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा, या धोरणाविरोधात ते उभे राहिले. आपण आझाद हिंद स्मारक उभे करु. हे काम कसे केले जाते, ते आपण दाखवून देऊ असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

पंतप्रधानांपुढे भाषणास नकार
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त कोलकाता येथील व्हिक्‍टोरिया मेमोरिअल येथे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत व्यासपीटावर आल्या मात्र त्यांच्या भाषणात अडथळा आणल्याने संतप्त होऊन भाषण करणार नसल्याचे ठणाकवून सामगत च्यासफीठ सोडले. हा एक शासकीय कार्यक्रम आहे. त्याची प्रतिष्ठा जपली पाहिजे. हा शासकीय कार्यक्रम आहे एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. पंतप्रधान मोदी व सांस्कृतिक मंत्रालयाने कोलकातामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केल्याबददल मी आभारी आहे. परंतु एखाद्यास आमंत्रित करून त्याचा अपमान करणे हे तुम्हाला शोभत नाही. याचा निषेध म्हणून मी इथे काहीच बोलणार नाही. जय हिंद, जय बंगाल.. असे सांगत त्याजागेवर जाऊन बसल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.