अलिबाग: मुख्यमंत्र्यांच्या हॅलिकॉप्टरला पुन्हा एकदा अपघात झाला असून मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुखरुप असल्याचे माहिती मिळत आहे.
फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला पेन याठिकाणी अपघात झाला. पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. फडणवीस यांचे हेलिकॉप्टर प्रचारसभेसाठी पेण बोरगाव या ठिकाणी लँड झाले. दरम्यान हेलिकॉप्टरची चाकं चिखलात रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरचे नियंत्रण सुटले. मात्र पायलटने प्रसंगावधान दाखवत नियंत्रण पुन्हा मिळवले.
हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे स्वीय सचिव, एक इंजिनिअर, एक पायलट आणि एक को पायलट असे पाचजण होते. हेलिगो प्रा. लि. चे हे हेलिकॉप्टर होते.