नवी दिल्ली – कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ ज्याला आपण ‘AI’ म्हणून ओळखतो. या तंत्रज्ञानाने सर्वत्र अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. आयटी ते अगदी चित्रकला क्षेत्रापर्यंत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ची किमया आपल्याला पाहायला मिळतेय. अशातच आणखी एक मजेशीर गोष्ट ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ने करून दाखवली आहे. ती म्हणजे जर जगातील सर्वात श्रीमंत लोक जर गरीब झाले तर कसे दिसतील?
याच प्रश्नावर मुकेश अंबानी, मार्क्स झुकेरबर्ग्स, बिल गेट्स, एलोन मस्क, ऑरेन बफेट अशा दिग्गज श्रीमंत व्यक्तींचे फोटो ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ने तयार केले आहेत. जे कि मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तुमच्या देखील भुवया उंचावतील. सध्या हे फोटो सगळीकडे व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर मजेशीर कमेंट करताना दिसून येत आहे.