ग्रामदैवताला साकडे घालत प्रचाराला सुरूवात
खडकवासला – सिंहगड खोऱ्यातील मालखेड (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात करत मोर्चेबांधणीसाठी जोर धरला असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनलने ग्रामदैवत काळभैरवनाथास साकडे घालून प्रचाराचा नारळ फोडला. मालखेड गावची लोकसंख्या एक हजारांच्या आसपास आहे. मतदारसंख्या साडेपाचशेच्या आसपास आहे. लोकसंख्येच्यादृष्टीने गावात जोरी कुटुंबीयांची भावकी आणि गावकीत दोन्ही पॅनल प्रमुखांचा घरोबा आणि चांगले संबध असल्याने सर्व स्तरावर त्यांचे वर्चस्व आहे.
गावात दोन वॉर्ड आहेत. दोन वॉर्डात सात सदस्य संख्या आहे. गावात आणि भावकीत निवडणुकीची चुरस असल्यामुळे निवडणुकीची रंगत वाढणार आहे. परंतु मतदारराजा प्रस्थापितांना पुन्हा सत्तेत आणणार की नव्यांना संधी देणार हे मतपेटीतून सिद्ध होणार आहे.
* श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनलचे सदस्य
1) अक्षता अनिकेत खाटपे
2) ऍड. विशाल दिलीप गोरे
3) नंदा लालदास जोरी
4) नायरा अहमद खान
5) चेतन सदाशिव भालेराव
6) गौतम परशुराम खाटपे
7) सुजाता तुकाराम खाटपे.
तर विरोधी गटाचे –
1) राजेंद्र मारुती जोरी
2) भारती राजेंद्र जोरी
3) वैजंता किसन जोरी
4) छाया तानाजी सुर्वे
5) धनराज किसन जोरी
6) रूपाली धनराज जोरी
7) अक्षय मोहन भालेराव.