नवी दिल्ली – प्रत्येक देशातील सरकार दरवर्षी आपला अर्थसंकल्प सादर करत असते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज भारताचा अर्थसंकल्प सादर करीत आहे. सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झाली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे.
दरम्यान, एका देशात मात्र मंत्री चक्क दारू पिऊन देखील बजेट सादर करू शकतो. हे वाचून तुम्हाला आचार्य वाटेल, मात्र हे सत्य आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने या बद्दल माहिती दिली आहे.
ब्रिटनमध्ये बजेट सादर करणाऱ्या मंत्र्याला चान्सलर म्हणतात. चान्सलर बजेटच्या दिवशी दारू पिऊन देखील संसदेत बजेट सादर करु शकतो. ब्रिटनचे संसद हाऊस ऑफ कॉम्सच्या नियमावलीत दारू पिऊन बजेट सादर करण्याचा तसा नियमच आहे.
मात्र, हा नियम केवळ चान्सलरला लागू होतो. या नियमावलीत लिहले आहे की दारू पिऊन बजेट सादर करण्याची परवानगी केवळ चान्सलरला आहे. तिही केवळ एका दिवसासाठीच.