नवी दिल्ली : सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात गेले दीड महिन्याहून अधिक काळ शांततेत सुरु असणाऱ्या आंदोलनाच्या शाहीनबागेतील ठिकाणी शनिवारी दुपारी गोळीबार करण्यात आला. जामीया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर झालेल्या गोळीबारापाठोपाठ ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरात त्यामुळे तणाव निर्माण झला असून या हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
का कायद्या विरोधात शेकडो महिला आणि पुरूष येथे निदर्शने करत आहेत. त्यांना गोळी मारा, असे प्रक्षोभक वक्तव्य एका केंद्रीय मंत्र्याने केल्याने त्यांना प्रचारास तीन दिवसांची बंदी घालण्यात आली होती. त्यापाठोपाठ जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर झालेल्या आंदोलनासमोर जाऊन एका तरूणाने गोळी झाडली होती. त्यात एक तरूण जखमी झाला होता.
Delhi DCP Chinmay Biswal on incident of firing in Shaheen Bagh: The man had resorted to aerial firing. Police immediately overpowered and caught him. (file pic) https://t.co/6sDVLyMLUS pic.twitter.com/0I6QwpgF0x
— ANI (@ANI) February 1, 2020
ही घटना ताजी असताना शाहीनबाग येथेही असाच प्रकार घडल्याने दिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याने गोळीबार करताच पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली. दरम्यान या हल्लेखोराने हवेत गोळीबार केला. त्याला तातडीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्यावर पटकन ताबा मिळवला. त्याला अटक केली आहे, असे दिल्लीचे पोलिस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांनी सागितले.
(सविस्तर वृत्त लवकरच)