मुंबई : मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतापले असून त्यांच्यावर आता पर्यंत तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तर त्यांना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
शिवसैनिकांनी च्या वक्तव्याचा निषेध केला असला तरी भाजपाने मात्र या वक्तव्याबद्दल राणेंना समर्थन दिले असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नारायण राणे यांना पाठिंबा देत आपलं मत व्यक्त केलं आहे.
ते म्हणाले,’ प्रत्येक व्यक्तीची एक स्टाईल असते. नारायण राणेंचीही अशीच एक स्टाईल आहे. मी त्यांचा विधानाचे किंवा शैलीचं समर्थन करत नाही. मात्र त्यासाठी थेट अटक करणे हे योग्य नाही? तेही एका केंद्रीय मंत्र्यांना? सरकारने, प्रशासनाने नारायण राणे यांना समज द्यायला हवी होती. मात्र थेट अटक करणं योग्य नाही. राज्य सरकारकडे केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचे अधिकार नाहीत. असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नारायण राणे Vs उद्धव ठाकरे संबंधित सर्व बातम्या –
नारायण राणेंच्या जुहू बंगल्याबाहेर भाजपा कार्यकर्ते – युवासैनिकांमध्ये तुफान राडा
‘मी कोणताही गुन्हा केला नाही; माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही’
“खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर या, तुमची औकात दाखवून देऊ”
शिवसेना ‘ऍक्शन मोड’मध्ये! तुफान दगडफेक करत नाशिकच्या भाजपा कार्यालयाची तोडफोड
नारायण राणे यांच्या अटकेसाठी पुणे पोलीस रवाना; मुख्यमंत्र्यांवरील टीका भोवणार
“नारायण राणे यांचे बाण वर्मी लागलेले दिसतायत”; भाजपच्या ‘या’ आमदाराचे राणेंना समर्थन
‘सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत’
मुंबईत शिवसेना आक्रमक; नारायण राणेंविरोधात ‘कोंबडी चोर’ उल्लेख करत बॅनरबाजी
video – ‘…मी असतो तर कानाखालीच चढवली असती’, राणेंची जीभ घसरली
नाशिक पोलीस आयुक्त राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आहेत का? आमचं पण सरकार ‘वर’ आहे
राणे म्हणाले, तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान, आता नाशिक पोलीस आयुक्त म्हणतात, ‘ते’ कोर्टात सांगा!
नारायण राणेंच्या आर डेक्कन येथील मॉलवर शिवसैनिकांची दगडफेक
”लाचार लोकांच्या घराला सिंहाची गुहा म्हणणं हा सिंहाचा अपमान”; राणेंना राऊतांचा टोला