मुंबई – ‘बिग बॉस मराठी’तून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सई लोकूरने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सई लवकरच आई होणार आहे. सध्या सई चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. मात्र सोशल मीडियावर ती सक्रिय असून अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. नुकतेच तिने चाहत्यांना ती आई होणार असल्याची माहिती इनस्टाग्रामवरून सांगितली आहे.
सईने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ आणि काही फोटा शेअर केले आहे. या पोस्टला सईने “हाताची दहा छोटी बोटं, पायाची दहा छोटी बोटं. प्रेम आणि आर्शिवादाने आमचं कुटुंब वाढत आहे. आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, एक आनंदाची बातमी लवकरच भेटीला येणार आहे.” असे कॅप्शन दिले आहे. सईच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे.
View this post on Instagram
सईने नोव्हेंबर 2020 मध्ये तीर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली होती. सईने बंगाली आणि मराठी पद्धतीने लग्न केले होते. लग्नानंतर आता दोन वर्षांनी सई आणि तीर्थदीप आई-बाबा होणार आहेत. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘जरब’, ‘मी आणि यू’, ‘कीस किसको प्यार करु’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यामुळे सईला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.