मेलबर्न –आयपीएलच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेला येत्या डिसेंबरपासून प्रारंभ होणार असल्याचे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने जाहीर केले आहे. त्याचवेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येत असल्याने या
स्पर्धेला अचानक ग्लॅमर प्राप्त झाले आहे. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंना सराव मिळावा, या हेतूनेच ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. बिग बॅश लीगच्या एकूण 61 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून स्पर्धेचे यंदा दहावे वर्ष आहे. स्ट्रायकर्स व रेनेगेड्स यांच्यातील सामन्याने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ऍडलेडमध्ये हा सामना होणार आहे. तसेच स्पर्धेत 11 ते 15 डिसेंबर या कालावधीत एकही सामना होणार नाही.