कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘गुगल आणि ॲपल’ कंपन्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली- सध्या जगभरात ‘कोरोना’ विषाणूने मोठा हाहाकार माजवला आहे. या भयानक विषाणूमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातल्या गुगल आणि ॲपल या दोन दिग्गजा कंपन्यांनी एकत्र आल्या असून, यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

या दोघांनी एकत्रितपणे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ टूल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आला असाल तर हे तंत्रज्ञान तुम्हाला तुमच्या फोनवर याची माहिती देईल. यात युजरजी ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाणार आहे.

या दोन्ही कंपन्या मिळून ब्लूटुथवर आधारित कोरोना विषाणू कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप तयार करणार आहेत.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.