पुणे : देशासह राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच मृतांचा आकडा देखील वेगाने वाढत आहे. दरम्यान, पुण्यात आज कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
शहरातील दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला आहे. यातील एक महिला संगमवाडी परिसरातील ५८ वर्षीय आणि सोमवार पेठेतील ५६ वर्षीय महिलेचा यात समावेश आहे. दरम्यान, दोन्ही रुग्णांना कोरोनाशिवाय इतर आजारही होते अशी माहिती पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.