बारामती (प्रतिनिधी) – कुरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांना घरपोच किराणा मिळावा यासाठी बारामती पॅटर्न अंतर्गत किराणा होम डिलिव्हरी नावाचे ॲप तयार करण्यात आले आहे. एका लिंकद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांसाठी हे ॲप्लिकेशन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे एका क्लिकवर बारामतीकरांना घरपोच किराणा मिळणार आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दल आणि COVID19 टीम बारामती तर्फे बारामतीमध्ये ऑनलाइन किराणा माल खरेदीसाठी KiranaHomeDelivery ॲप तयार करण्यात आले आहे. लिंकच्या माध्यमातून.4-5 मिनिटात app install होते. ॲपच्या माध्यमातून इंग्रजी तसेच मराठी मध्ये जवळच्या मॉल अथवा दुकानदारासऑर्डर पाठवता येते. संबंधित दुकानदार ऑर्डर तयार करून बारामती पॅटर्न मधील स्वयंसेवक उपलब्ध असतील तर त्यांचे मार्फत किंवा स्वतः चे लोक पाठवून माल घरपोच देणार आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती पॅटर्न अंतर्गत नागरिकांना घरपोच किराणा माल पोहोचवण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि पोलीस जवान स्वप्नील अहिवळे, विशाल जावळे, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, शर्मा पवार तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि बारामती नगर परिषद, आरोग्य विभाग यांच्या प्रयत्नाने (Kirana Home Delivery )हे ॲप विकसित करण्यात आले आहे.यामध्ये सर्व मोठ्या मॉलसह बाकी दुकांदरांचा समावेश आहे.
सदरची ऑर्डर आपण निवड केलेल्या मॉलला/दुकानदारास त्यांचे मोबाईल वर मिळणारआहे. ते ऑर्डर तयार करून घरी पाठवतील. दरम्यान आवश्यक असल्यास त्या दुकांदरांचा मोबाईल नंबर app वर असल्याने तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. आवशक्यता पडल्यास दुकानदार ही ग्राहकांना फोन करतील . याबाबत अडचण आल्यास स्वप्निलअहिवळे 8805029138 विशाल जावळे 8605802424 संदीप जाधव 9881604141 पोलीसउपनिरीक्षक यादव 9923630652 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.