नगर – नगरचा विकास होण्यासाठी व तरुणांना रोजगार मिळण्यासाठी सुपा एमआयडीसीत परदेशातून विविध कंपन्या आणल्या आहेत. त्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने जापनीज कंपन्यांना मूलभूत सुविधा दिल्या. या मायडिया कॅरियर, आणि मिंडा या कंपन्यांचे जानेवारीध्ये उत्पादन सुरु होणार होते.
परंतु, सुपा एमआयडीसीतील मायडिया, कॅरियर व मिंडा या कंपन्यांच्या ठेकेदारांवर गौणखनिज उत्खनन प्रकरणी वाहने जप्त करत दंडात्क कारवाई केली आहे. ही कारवाई चुकीच्या पद्धतीने केली असून सरकार बदलल्याचा परिणाम असून स्थानिक लोकप्रतिनिधीचा हात असल्याचा संशय भाजपाचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केला. दरम्यान, तहसीलदारांनी केलेल्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत तहसीलदार यांच्यावर कारवाई करावी.
सुपा एमआयडीसीतील मायडिया, कॅरियर व मिंडा या तीन कंपन्यांवर चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाई बाबत पत्रकार परिषदेत बोलत होते. गांधी म्हणाले, औद्योगिक विकासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले. सुपा येथे जपानी कंपन्या आणल्या. त्या कंपन्यांचे दोन जानेवारीला उत्पादन सुरु होणार होते. रात्रं-दिवस शिनरी बसविण्याचे का सुरु आहे. मात्र, शनिवारी कंपन्यांच्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली.
त्यांची वाहने जप्त करण्यात आली. मायडिया व मिंडा या दोन कंपन्यांनी 5 कोटी 60 लाख रुपये रॉयल्टी भरली आहे. असे असतांनाही कारवाई झाली ही दुदैवी घटना आहे. या कंपन्यांधून सुमारे पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. तहसीलदारांनी रात्री दोन वाजता कारवाई करण्याचे कारण नाही. कारवाईला राजकीय वास असून याबाबत माजी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.
तसेच तहसीलदारांनी अधिकारी प्रशांत दरेकर, मुकेश कुमार यांना कार्यालयात डांबून ठेवले. याप्रकरामुळे कंपन्यांचे काम गेल्या तीन-चार दिवसांपासून बंद आहे. उद्योगपती हे तुमचा मार खायला आले नाहीत, ते येथील स्थानिकांना रोजगार द्यायला आले आहेत. नगरमध्ये एका उद्योजकाला मारहाण झाल्याने नगर एमआयडीसीत कोणी उद्योजक यायला तयार नाही. पांढरीपूल एमआयडीसीचे घोंगडे भीजत पडले आहे. विद्यमान सरकारने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी कंपन्या वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांना हाणून मारून पिटाळून देऊन तरुणांना बेरोजगार करू नका. असे माजी खासदार गांधी म्हणाले. सुपा एमआयडीसीत घडलेल्या प्रकाराबाबत पीएमओ कार्यालय, मुख्यंमत्री, माजी मुख्यंमत्री, उद्योगंमत्री यांना निवेदन दिले जाणार आहे.