बॅंकॉक :- थायलंडमधील पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि “मुव्ह फॉरवर्ड पार्टी’चे नेते पिटा लिमजारोएन्राट यांना देशाच्या घटनापीठाने पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास मनाई केली आहे.
पिटा लिमजारोएन्राट यांच्याविरोधात निवडणूक गैरव्यवहाराचे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे त्यांना या निवडणुकीत उमेदवार म्हणून सहभागी होता येणार नाही, असे घटनापीठाने म्हटले आहे.
“मुव्ह फॉरवर्ड पार्टी’ने या वर्षी मे महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवले होते. या पक्षाच्या नेतृत्वाखाली पक्षांची आघाडीने 312 जागा मिळवून प्रतिनिधीगृहामध्ये बहुमत मिळवले असून ही आघाडी सध्या थायलंडमध्ये सत्तेवर आहे.
पिटा लिमजारोएन्राट यांनी पंतप्रधान बनण्यासाठी एकदा प्रयत्न केला आहे. मात्र, संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये त्यांना पंतप्रधान म्हणून निवडले गेले नव्हते. यामुळे ते पुन्हा एकदा संसदेमध्ये नेता म्हणून निवडले जाण्याचा प्रयत्न करणार आहेत.
मात्र, त्यांच्यावरील निवडणूक गैरव्यवहारांच्या आरोपांबाबतची सुनावणी प्रलंबित असेपर्यंत त्यांना आता पंतप्रधानपदाची निवडणूक लढवता येणार नाही.