केसांची असामान्य वाढ तुम्ही पाहिली असेल. पण तुम्ही कधी कोणाच्या जिभेवर केस पाहिले आहेत का? जिभेवर केस असलेल्या महिलेचा फोटो व्हायरल होत आहे.
या फोटोत महिलेच्या जिभेवर इतके केस होते की, ते पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. या महिलेच्या जिभेवर केस कसे आले हा मुद्दा सध्या शोषलवर चर्चेत आला आहे. मिनोसायक्लिन नावाच्या प्रतिजैविकांच्या प्रतिक्रियेपासून, मुरुमांपासून ते न्यूमोनियापर्यंत या प्रतिजैविकांचा वापर केला जातो.
ब्रिटिश मेडिकल जर्नल केस रिपोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, महिलेचे वय 60 आहे. महिलेला रेक्टल कॅन्सर (कोलन किंवा रेक्टमचा कॅन्सर) आणि लिव्हर मेटास्टॅसिस कॅन्सर (शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागात पसरलेला कर्करोग) आहे. 14 महिन्यांपूर्वी जपानमध्ये महिलेच्या कर्करोगावर उपचार सुरू झाले. कॅन्सरच्या उपचारात केमोथेरपीही सुरू होती. केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ही महिला मिनोसायक्लिन अँटीबायोटिक्स घेत होती.
मिनोसायक्लिन अँटीबायोटिक्स या गोळीच्या मदतीने ही महिला त्वचेच्या जखमा टाळण्यासाठी दररोज 100 मिलीग्राम गोळी घेत असे त्यानंतर काही दिवसातच महिलेचा चेहरा राखाडी होऊ लागला, महिलेची जीभ काळी पडू लागली, खूप जास्त प्रमाणात या महिलेच्या चेहऱ्यावर पीपल्स येऊ लागली. आणि जिभेवर केस येऊ लागले.
रिपोर्टनुसार, या महिलेवर आधी कोणत्यातरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नंतर ती इतर डॉक्टरांकडे गेली. जिथे डॉक्टरांनी त्याच्या तोंडाची तपासणी केली. तेव्हा त्यांना त्याची प्रकृती कळली. नंतर या आजारावर उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी सांगितले की, सहा आठवड्यांच्या उपचारानंतर महिलेच्या चेहऱ्यावरील लालसरपणा कमी होऊ लागला आणि जिभेवरील केसही सुधारले.
या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टरांच्या काही गोष्टी लक्षात आल्या. एखाद्या रुग्णाच्या त्वचेवर काळे डाग पडण्याआधी त्याला दिलेल्या औषधांच्या तपासणीप्रमाणे. औषधांचे काय झाले की रुग्णाची जीभ काळी पडली, केस वाढले.