पिंपरी, दि. 6 – दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ४) सकाळी शाहूनगर, चिंचवड येथे घडली.शुभम सुधाकर उगले (वय २६, रा. घरकुल हाऊसिंग सोसायटी, निगडी), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम रविवारी सकाळी शाहूनगर येथून जात होते. दरम्यान, टाटा मोटर्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये शुभम गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी नसल्याने अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.