नवी दिल्ली – भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशात आणखी १ हजार ११८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ हजार ९३३ वर पोहचला आहे.
दरम्यान, “कोविड-19′ संदर्भात, परदेशातून साधनांचा पुरवठा सुरु झाला असून, चीनने देणगी म्ह्णून दिलेली 1.70 लाख पीपीई (वैद्यकीय कर्मचाऱ्यासाठीचे वैयक्तीक संरक्षण साधन संच) भारतात आली आहेत. मात्र, चीनच्या बड्या खाजगी कंपन्यांनी भारताला ज्या पीपीई किट्स मदत म्हणून दिल्या, त्या गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरल्या.
मिळलेल्या माहितीनुसार, चीनवरुन 1.70 लाख पीपीई किट्स आल्या. यापैकी 50,000 किट्स या गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरल्या आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या किट्स डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट ऑर्गनाईझेशन लेबॉरेटरी ग्वालियर येथे तपासल्या गेल्या. या रिपोर्टनुसार, काही किट्स या चाचणीत अयशस्वी ठरल्या असून, आता त्यांचा वापर केला जाऊ शकत नाही, असं एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितलं.