सातारा – सातारा-जावळीतील 53 कामांसाठी “लेखाशीर्ष 2515’मधून दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. त्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले आहेत.
या पत्रकात म्हटले आहे की, सातारा तालुक्यातील केळवली-दत्तवाडी रस्ता, हनुमाननगर-इंगळेवाडी पोहोच रस्ता, शेंद्रे एबीआयटी कॉलेज ते कातकरी वस्ती रस्ता (प्रत्येकी 50 लाख), राज्य मार्ग 140-बेबलेवाडी-ठोंबरेवाडी पोहोच रस्ता (40 लाख), आगुंडेवाडी पोहोच रस्ता (35 लाख), सोनवडी येथे सभामंडप, करंजे तर्फ परळी अंतर्गत रस्ता (प्रत्येकी 25 लाख), लिंब-आवळी माथा-दुलाचे टेक रस्ता, लुमणेखोल जानाई मंदिर रस्ता, नित्रळ अंतर्गत रस्ता, कामथी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण (प्रत्येकी 20 लाख), शिंदेघर अंतर्गत रस्ता, पाटेघर अंतर्गत रस्ता, खडगाव अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, वावदरे गावठाण अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, दरे तर्फ परळी अंतर्गत रस्ते, जोतिबाची वाडी सभामंडप,
आगुंडेवाडी ग्रामपंचात कार्यालय ते जयवंत जाधव घर रस्ता कॉंक्रिटीकरण (प्रत्येकी 15 लाख), सावली अंतर्गत रस्ता, वेणेखोल अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, तांबी येथे वाघजाई मंदिर परिसरात कॉंक्रिटीकरण, पेव्हर्स, कुस खुर्द भैरवनाथ मंदिराशेजारी संरक्षक भिंत, यादववाडी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, बोरणे अंतर्गत रस्ता, अलवडी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, कोंडवली श्री दत्त मंदिरासमोर सभामंडप, ठोंबरेवाडी-हनुमाननगर रस्ता, नागेवाडी-काळकाईदेवी रस्ता, सारखळ येथे चंद्रकांत बडदरे घर ते ग्रामपंचायत कार्यालय रस्ता कॉंक्रिटीकरण (प्रत्येकी दहा लाख), जोतिबाची वाडी येथे जोतिबा मंदिरासमोर कॉंक्रिटीकरण, चोरगेवाडी येथे मछिंद्र चोरगे घराकडे जाणारा रस्ता (प्रत्येकी पाच लाख), ही कामे मंजूर झाली आहेत.
जावली तालुक्यातील कुसुंबी मुख्य प्रवेशद्वार ते बाबा चौक रस्ता रुंदीकरण (85 लाख), तांबी अंतर्गत रस्ता (50 लाख), कुसुंबी येथे अंतर्गत कॉंक्रिटीकरण (30 लाख), कुसुंबी येथे बामणवाडी ते स्मशानभूमी मेसाचीवाडी येथे रस्ता (30 लाख), हातगेघर मुरा पोहोच रस्ता, वालुथ-जरेवाडी रस्ता (प्रत्येकी 20 लाख), कुडाळ येथे मुस्लिम दफनभूमी संरक्षक भिंत व सुशोभिकरण, हातगेघर ते भालेघर रस्ता, खिलारमुरा रस्ता मजबुतीकरण, दिवदेव अंतर्गत रस्ता,
कुसुंबी गणेश मंदिर-जांभुळवाडी-विठ्ठल कुडवे घरापर्यंत रस्ता (प्रत्येकी 15 लाख), पिंपळी येथे वाघजाई मंदिर संरक्षक भिंत, पानस पुनर्वसन येथे रस्ता, सनपाने येथे दुर्गावळे वस्ती रस्ता, घोटेघर येथील सुलेवाडी रस्ता कॉंक्रिटीकरण, सरताळे ग्रामपंचायत ते म्हसवे पाटी रस्ता, तळेमाळ अंतर्गत रस्ता, महिगावात मुन्ना मुसळे घर ते नामदेव पवार घर रस्ता कॉंक्रिटीकरण, मोरावळे येथे विवरमुरा सभामंडप, कोळघर रस्ता सुधारणा, केळघर तर्फ सोळशी रस्ता, वाळंजवाडी अंतर्गत रस्ता (प्रत्येकी दहा लाख), ही कामे मंजूर झाली आहेत.