मुंबई – मागील काही दिवसांपासून मंदिरं, लोकल आणि जीम सुरू करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी जनतेला संबोधित केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार इतक्यात तरी राज्यातील मंदिरं, लोकल, जीम सुरू होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मला गर्दी नकोय, असे म्हटले आहे. त्यामुळे लाॅकडाऊनपूर्वी ज्याप्रमाणे लोकल सेवा सुरू होती तशी लोकल सेवा सध्यातरी सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/E8qhmRTulz
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 11, 2020
राज्यांतर्गत रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लोकलची संख्या वाढवण्याची देखील मागणी केली असून ती मान्य झाल्यास आणखी काही लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
जीम सुरू करण्याबाबत लवकरच नियमावली आखण्यात येणार आहे. जीममध्ये व्यायाम करत असताना हार्टच पम्पींग रेट जास्त असतो. त्यामुळे श्वासोश्वास वाढून कोरोणाचा प्रसार होऊ शकतो असे मुख्यमंत्री म्हणाले.
मंदिर उघडण्याच्या मागणीवर उद्धव ठाकरे म्हणाले की, मंदिर बेद ठेवण्याची आमची इच्छा नाही, मात्र उघडलेल्या दारातून समृद्धी आली पाहिजे कोरोना नको, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यामुळे राज्यातील मंदिरं, लोकल आणि जीम इतक्यात तरी सुरू होण्याची चिन्हं दिसत नाहीत.