कन्याकुमारीमधील ध्यानधारणेतून नवे संकल्प; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्राद्वारे सांगितला अनुभव

PM Narendra Modi | लोकसभा निवडणुकांचे सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जून रोजी कन्याकुमारी येथे गेले होते. येथे सलग तीन दिवस त्यांनी ध्यानधारणा केली. विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये त्यांनी 45 तास ध्यानधारणा केली. येथील त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आचारसंहितेचा भंग केल्याचेही अनेकांनी म्हंटले. मात्र ध्यानधारणावरून परतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी कन्याकुमारीच्या तीन दिवसाच्या अध्यात्मिक यात्रेतील अनुभव सांगितले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट Narendra Modi
“लोकशाहीची जननी असलेल्या आपल्या देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव पार पडला आहे. तीन दिवस आध्यात्मिक सानिध्यात घालवल्यानंतर दिल्लीला जाण्यासाठी मी विमानात बसतो आहे. मी एक खास उर्जा माझ्यासह घेऊन निघालो आहे. २०२४ च्या निवडणुकीत अनेक सुखद योगायोगही मी पाहिले आहेत. आपला देश अमृतकाळात आहे. या निवडणुकीचा प्रचार मी 1857 च्या उठावाचं प्रेरणास्थळ असलेल्या मेरठ येथून सुरु केला. त्यानंतर भारताचा प्रवास करताना माझी शेवटची सभा पंजाबमधील होशियारपूर या ठिकाणी पार पडली. संत रविदास यांची ही भूमी आहे.”
“पंजाबमध्ये माझी अखेरची प्रचारसभा पार पडल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यानंतर मला कन्याकुमारी या ठिकाणी येऊन शांतता लाभली. भारतमातेच्या पायाशी मी बसलो होतो असाच अनुभव मी या ठिकाणी घेतला. मी ध्यानधारणा सुरु केली तेव्हा सुरुवातीला माझ्या डोक्यात बराच गोंधळ होता. माझ्यासमोर माझ्या निवडणुकीच्या प्रचारसभा, रॅली, लाखो माता भगिनींचे आशीर्वाद, त्यांनी दाखवलेलं असीम प्रेम, विश्वास, आपुलकी हे सगळं सगळं येत होतं. त्यामुळे माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. हळूहळू मी शून्यात जाऊ लागलो, योगसाधना सुरु झाली.”
“माझ्या मनात विरक्तीचा भाव निर्माण झाला. कन्याकुमारीच्या तीन दिवसाच्या अध्यात्मिक यात्रेत वेगवेगळे अनुभव एवढी मोठी जबाबदारी पार पाडत असताना अशा प्रकारे ध्यान करणं कठीण असतं. मात्र स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने मी हे साध्य करु शकलो. कन्या कुमारीच्या उगवत्या सूर्याने माझ्या विचारांना नवी उंची दिली. तर समुद्राच्या विस्तीर्णतेने माझ्या विचारांना दृढता दिली. ब्रह्मांडातल्या एका सुंदर शांततेचा आणि एकाग्रतेचा अनुभव मी ध्यानधारणेत गेला.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. Narendra Modi
“कन्याकुमारी में साधना से नये संकल्प”
आइए, तेज कदमों से चलें… मिलकर चलें, भारत को विकसित राष्ट्र बनाएं।
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी द्वारा 1 जून को कन्याकुमारी से दिल्ली लौटते समय लिखे गए विचार।
पूरा पढ़ें : https://t.co/N9l324uN4c#NewSankalp4Bharat pic.twitter.com/0vrP2RQao6
— BJP (@BJP4India) June 3, 2024
आता नवी स्वप्नं बघायची
“भारताची ‘डिजिटील इंडिया मोहीम’ सगळ्या जगासाठी आदर्श ठरते आहे. गरीबांना सशक्त करण्यात या मोहिमेचा मोठा सहभाग आहे. आज प्रगतीचे नवे आलेख आपला देश ओलांडतो आहे. भारताच्या प्रगतीसाठी आता यापेक्षा मोठी संधी नाही. आपल्या देशासह आपल्या बरोबर असणाऱ्या देशांसाठीही ही मोठी संधी आहे. जी २० च्या यशानंतर जगभरात भारताचं कौतुक होतं आहे. आता आपल्याला नवी स्वप्नं बघायची आहेत. त्यासाठी आपण मार्गक्रमण सुरु केलं आहे.”
“वैश्विक परिदृश्याचा विचार करता पुढे जाण्यासाठी आपल्याला काही बदलही करावे लागतील. २१व्या शतकातील जग आज भारताकडे खूप आशेने पाहत आहे. सुधारणा याबाबतचा पारंपरिक विचारही आपल्याला बदलले पाहिजे. आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सुधारणेच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागेल. आपल्या सुधारणा विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला अनुरूप असायला पाहिजेत,” असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.
हेही वाचा:
विधानपरिषदेसाठी भाजपा-राष्ट्रवादी-मनसे-शिवसेना एकमेकांविरोधात ; भाजपकडूनही उमेदवार जाहीर





