मुंबई – टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या जोडीची कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चा रंगते. ‘बिग बॉस 15’ शोमध्ये या दोघांची जोडी अनेकांच्या पसंतीस पडली होती. सोशल मीडियावर ते नेहमीच पोस्ट्स शेअर करत असतात. पोस्टमध्ये हे जोडपे एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. चाहते त्यांच्या केमिस्ट्रीचे नेहमीच कौतुक करत असतात. सध्या या जोडप्याच्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. करण आणि तेजस्वीने या आधीच लग्न केले असल्याची अफवा सध्या पसरली आहे.
खरं तर तेजस्वी आणि करण यांनी नुकतीच मुंबईत इस्रायलचे कौन्सुल जनरल कोबी शोशानी यांची भेट घेतली होती. यादरम्यान इस्रायली कौन्सिल जनरलने त्यांचा एकत्र एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये तेजस्वीला करणची पत्नी असे लिहिले. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “करण कुंद्रा एक सुंदर अभिनेता तसेच एक सज्जन माणूस आहे. त्यांची पत्नी तेजस्वी प्रकाश यांना भेटूनही खूप आनंद झाला.” याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आणि लोकांना असे वाटू लागले की हे जोडपे आधीच विवाहित आहे.
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना करणने लिहिले की, “आम्हाला तुमच्या घरी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला कुटुंबासारखे वाटले. ” त्याचवेळी, तेजस्वी आणि करणचा इस्रायलचे कौन्सुल जनरल कोबी शोशानी यांच्यासोबतचा फोटो व्हायरल होताच चाहत्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले, “मिसेस आणि मिस्टर करण कुंद्राला कोणाची नजर न लागो.” तर दुसर्याने लिहिले, “आम्हाला हे आधीच माहित होते.”
View this post on Instagram
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, करण कुंद्रा शेवटचा ‘तेरे इश्क में घायाल’ मध्ये रीम शेख आणि गश्मीर महाजनीसोबत दिसला होता. तर, तेजस्वी प्रकाश ‘नागिन 6’ मध्ये दिसली होती. तेजस्वीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने मराठी चित्रपटातही काम केले आहे.