अहमदाबाद – सध्या देशात करोना संसर्गाच्या प्रसारामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन अभ्यासाला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र या ऑनलाईन अभ्यासाचे आणि शालेय वर्गांचे दुष्परिणाम समोर येण्यास सुरुवात झाली आहे. एका 15 वर्षीय मुलीने ऑनलाईन शिक्षण घेत असताना केलेल्या कृत्यामुळे तिच्या आई-वडिल दोघांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याचं समोर आलं आहे.
सविस्तर वृत्त असं की, अहमदाबाद येथील एका कुंटुबाने आपल्या मुलीला ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी अँड्रॉईड मोबाईल फोन घेऊन दिला होता. मात्र या मुलीने मोबाईल फोनवरून स्वत:चे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे मुलीने आपल्या चुलत बहिणीला देखील असं करण्यास सांगितलं.
चुलत बहिणीच्या पालकांना ही बाब समजली. त्यांनी तातडीने फोटो अपलोड करणाऱ्या मुलीच्या म्हणजेच आपल्या भावाला संपूर्ण माहिती दिली. तसेच तुमची मुलगी आमच्या मुलीला अश्लील फोटो पाठवत असल्याचं सांगितलं.
दरम्यान मुलीच्या पालकांनी तिला अभ्यास करता यावा यासाठी स्वतंत्र रुम उपलब्ध करून दिली होती. मात्र तक्रार मिळाल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचे मॅसेज आणि मोबाईल चेक केला. त्यात मुलगी आपल्या गुप्तांगाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर मुलीचे आई-वडिल दोघांना हृदयविकाराचा धक्का बसला. दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. आता या मुलीचं समुपदेशन करण्यात आलं आहे. तसंच तिने आपण अभ्यासासाठीच मोबाईल फोनचा वापर करू, असा शब्द दिला आहे.