मुंबई – प्रसिद्ध गायक गुरु रंधावा हा त्याच्या पंजाबी गाण्यांसाठी ओळखला जातो. नुकत्याच त्याच्या प्रदर्शित झालेल्या “डान्स मेरी राणी” या गाण्याला तब्बल सात कोटी पेक्षा जास्ती व्ह्युज मिळाले आहे.
या गाण्याची चर्चा केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशात झाली आहे. जगभरातून या गाण्यावर नाचतानाचे अनेक व्हिडिओज सध्या सोशल मीडिया वर ट्रेंडींगमध्ये आहेत. एका शालेय विद्यार्थिनीने या गाण्यावर केलेला डान्स खूपच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ गुरु रंधावा याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर केला असून त्याला जवळ 25 लाखांहून अधिक व्ह्युव मिळाले आहे. तसेच अनेक कमेंट्स पण आल्या आहेत. हा विडिओ शेअर करत त्याने सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.