मुंबई :- मीस्टर 360 अशी ओळख निर्माण करणारा सूर्यकुमार यादव एकदिवसीय सामन्यांमध्ये फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. तो ज्या पद्धतीने टी-20 क्रिकेटमध्ये वर्चस्व राखतो ते त्याला एकदिवसीय सामन्यांत जमलेले नाही.
त्याला वारंवार संधी देऊनही तो त्याचा लाभ घेण्यात यशस्वी होताना जिसत नाही. त्यामुळेच येत्या काळात त्याला एकदिवसीय संघातून डच्चू दिला जाणार असल्याचे संकेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीच दिले आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याच्याकडून असलेल्या मोठ्या खेळीच्या अपेक्षा फोल ठरल्यामुळे आगामी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठीही त्याचा विचार केला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.