T20 WorldCup – टी-२० विश्वचषक २०२२ च्या सुपर-१२ फेरीतील सामान्यांना २२ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. या फेरीचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळाला जात आहे. या सामन्यानंतर दुसरा सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध सामन्याने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर गेल्या विश्वचषकात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती भारतीय संघाला टाळावी लागणार आहे.
मागील टी-२० विश्वचषकमध्ये ( T20 WorldCup ) भारतीय संघाला पाकिस्तान संघाविरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघांविरुद्ध सुरुवातीचे सामने गमावल्यानंतर भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता. भारतीय संघाला टी-२० क्रिकेटमध्ये होणाऱ्या चुकांना टाळावे लागणार आहे. कारण भारताने मागील महिन्यात खेळल्या गेलेल्या आशिया चषक स्पर्धेत खूपच खराब प्रदर्शन केले आहे. आशिया चषकात भारताला पाकिस्तान आणि श्रीलंका संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.
#T20WorldCup : आयर्लंडने गुंडाळला विंडीजचा गाशा
वरच्या फळीतील फलंदाजांवर नजर
भारतीय संघात वरच्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीत कायम चढउतार राहिला आहे. कारण केएल राहुल आणि रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर अनेकवेळा संघ अडचणीत सापडला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये पाहिलं तर राहुल आणि रोहित यांना जास्त वेळा संघाला चांगली सुरुवात करून देता आलेली नाही. 2021 च्या विश्वचषकात ( T20 WorldCup ) खेळल्या गेलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीने केएल राहुल आणि रोहित शर्माला स्वस्तात बाद केले होते. त्यानंतर भारतीय धावसंख्येला ब्रेक लागला होता, त्यामुळे भारताला त्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. संघाच्या वरच्या फळीतील फलंदाजीची जबाबदारी सलामीवीरानंतर विराट कोहलीच्या खांद्यावर येते. त्यामुळे सुरुवातीला लवकर गडी बाद झाल्यास दडपण घेण्याऐवजी मोकळेपणाने खेळावे लागेल.
डेथ ओव्हर्समध्ये डॉट बॉल्सची समस्या
भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर संघाच्या धावसंख्येवर मोठा परिणाम होतो. अनेकवेळा वरच्या फळीतील फलंदाज बाद झाल्यानंतर भारतीय संघ दबावाखाली खेळताना दिसला आहे. त्यामुळे मधल्या षटकांमधील डॉट बॉल्सची संख्या वाढते. अशात संघावर दबाव जाणवतो आणि पराभवाला सामोरे जावे लागते. भारताला यंदाच्या विश्वचषकात बाजी मारायची असेल तर डॉट बॉल्स खेळण्यावर नियंत्रण आणावे लागणार आहे. मागील विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताला डॉट बॉल्सची मोठी समस्या जाणवली होती. त्या चुकांमधून धडा घेऊन भारतीय संघाला यंदाच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
डाव्या हाताच्या गोलंदाजांना खेळण्यात अडचण
भारतीय फलंदाजांना जाणवलेली सर्वात मोठी समस्या म्हणजे डाव्या हाताच्या गोलंदाजांना खेळणे. कारण शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत भारताविरुद्ध फक्त एकच सामना खेळला आहे, पण भारतीय कॅम्पमध्ये त्याचीच सर्वाधिक चर्चा आहे. याचे कारण म्हणजे टी-२० विश्वचषक २०२१ च्या पहिल्याच षटकांमध्ये भारताच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचे काम आफ्रिदीने केले होते. तसे पाहिले तर केवळ शाहीन आफ्रिदीच नाही तर जवळपास सर्वच आघाडीचे डावखुरे गोलंदाज हे भारतीय फलंदाजांची नेहमीच डोकेदुखी राहिली आहे. त्यामुळे गौतम गंभीरने म्हटले तसे, भारतीय फलंदाजांनी आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बचावात्मक क्रिकेट न खेळता आक्रमण करायला हवे. तरच डाव्या हाताच्या गोलंदावांवर वर्चस्व मिळवता येईल.
Snapshots from #TeamIndia‘s training session at the MCG ahead of #INDvPAK tomorrow 📸📸 pic.twitter.com/yR17Sku8Se
— BCCI (@BCCI) October 22, 2022
दिनेश कार्तिकने संघासाठी फिनिशरची भूमिका बजावणे महत्त्वाचे
गेल्या वर्षभरात टीम इंडिया प्रत्येक मालिकेत नवनवीन प्रयोग करताना दिसली आहे. कधी कधी तर एकाच वेळी भारताचे तीन संघ वेगवेगळ्या ठिकाणी क्रिकेट खेळताना दिसले आहेत. प्रयोग करणे ही वाईट गोष्ट नाही, पण जेव्हा त्या प्रयोगातुन कोणताच परिणाम मिळत नाहीत, तेव्हा मात्र प्रश्न निर्माण होतात. म्हणजे भारताने मिळालेल्या वेळेत फक्त प्रयोगच केले. एक मजबूत संघ बनवायला वेळेचं मिळाली नाही, असेही म्हणता येईल. दिनेश कार्तिक हा खेळाडू भारतासाठी या प्रयोगातून समोर आलेली एक सकारात्मक बाजू आहे. याव्यतिरिक्त कोणताही प्रयोग भारतासाठी फायद्याचा ठरलेला नाही. मागील विश्वचषकात भारताने वरून चक्रवर्ती आणि राहुल चहर यांना पसंती दिली होती. मात्र आता ते फक्त एक इतिहास बनून राहिले आहेत. भारताला पुन्हा युझवेन्द्र चहल आणि आर.अश्विन यांच्याकडे वळावे लागले आहे.
नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार
२०२१ चा टी-२० विश्वचषक ( T20 WorldCup ) भारताच्या यजमान पदाखाली युएईमध्ये खेळवण्यात आला होता. तेथील मैदानांवर नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्वाचा ठरला होता. कारण ज्या संघाने नाणेफेक जिंकली त्या संघाचे पारडे जड मानले जायचे. मात्र यंदाच्या स्पर्धेत खेळपट्टी ही पूर्णपणे वेगळी आहे. ऑस्ट्रेलियात क्रिकेटचा अनुभव नसलेल्या फलंदाजांना आणि गोलंदाजांना येथे खेळणे कठीण जाते. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत देखील नेणेफेकीचा कौल हा महत्वाचा राहणार आहे.