नवी दिल्ली – देशातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन टाटा ग्रुपने लिक्वीड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 24 क्रायोजनिक कंटेनर्स आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना या संकटकाळात मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
त्याला प्रतिसाद देताना टाटा ग्रुपने हा निर्णय घेतला आहे. हे क्रोयोजनिक कंटेनर्स विषेश विमानाने आणण्यात येणार आहेत. कोविडच्या पहिल्या साथीच्यावेळीही टाटा ग्रुपने व्हेंटिलेटर्स तसेच पीपीई किट्स, मास्क, ग्लोव्हज, आणि टेस्टींग किट्स मोठ्या प्रमाणात आयात करून देशवासियांना मदत केली होती.
त्यांनी ही सामग्री दक्षिण कोरिया, चीन आणि अमेरिकेहून आयात केली होती. या गटाने कोरोना मदत निधीसाठी पंधराशे कोटी रूपयांची रोख मदतही आत्तापर्यंत केली आहे.