लॉकडाऊन ठरतोय पती-पत्नींमध्ये दुराव्यासाठी कारणीभूत

सोलापूर  – करोनाच्या साथीमुळे मागील वर्षीच्या लॉकडाऊनचे परिणाम आता सोलापुरात दिसून येऊ लागले आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान अनेकांची कामे वर्षभर ठप्प झाली, तर अनेकांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. परिणामी जगणे अवघड बनले. इतकेच नव्हे तर लॉकडाऊनमुळे घरातील आर्थिक बजेट पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे कौटुंबिक कलहाला खतपाणी मिळाले. यातूनच पती पत्नीमध्ये वारंवार वाद होऊन अनेकांनी एकमेकांपासून विभक्‍त होण्याचा पर्याय स्वीकारला. सोलापुरातील कौटुंबिक न्यायालयात 1 जानेवारी ते 1 मार्च 2021 या केवळ दोनच महिन्यांत तब्बल 91 जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्याने लॉकडाऊनमुळे पती-पत्नी एकमेकांपासून दुरावत चालल्याचे चित्र समोर आले आहे.

दरम्यान, आताच्या करोनाच्या या गंभीर परिस्थितीमुळे न्यायनिवाडा करण्यात अडथळा निर्माण झाला असला, तरी या अर्जापैकी एकाचासुद्धा घटस्फोट झालेला नाही. करोनाच्या साथीमुळे ही सर्व प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र, मागील प्रलंबित प्रकरणातील 42 जोडप्यांचा घटस्फोट मात्र झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.