मुंबई – हॉट अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच इंस्टाग्रामवर सक्रिय असते. तिच्या बोल्ड फोटो शूटमुळे ती नेहमी चर्चेत असते. नशा चित्रपटातून पूनम पांडे हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पूनमला इन्स्टाग्रामवर 30 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. मात्र यावेळी ती तिच्या फोटोशूटमुळे नाहीतर लग्नामुळे चर्चेत आली होती. तर आता मॉडेल पूनम पांडे आई होणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, पूनम गर्भवती असल्यामुळे आता सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. डॉक्टर वरखा प्रभुगावकर यांनी पूनम 6 आठवड्यांची गर्भवती असल्याचे म्हटले होते. मात्र, आता खुद्द पूनमने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
पूनम पांडे म्हणाली कि, “आपण आई होणार असल्याचे वृत्त निव्वळ अफवा आहे. मी आता गर्भवती नसून, जेव्हा ही आनंदाची बातमी येईल, तेव्हा सगळ्यांसोबत नक्की शेअर करेन”. असं ती म्हणाली. एका प्रसिद्ध वृत्त वेबसाईटच्या मुलाखतीत पूनम बोलत होती.
View this post on Instagram
अभिनेत्री पूनम पांडेने नशा या सिनेमाद्वारे तिचं करिअर सुरु केलं होतं. मात्र हॉट व्हिडीओ पोस्ट करण्यात ती अग्रेसर आहे. तिला इन्स्टावर फॉलो करणारा खास असा तिचा फॅन फॉलोईंग आहे. पूनम पांडेच नाही तर तिचा बॉयफ्रेंड आणि नवरा सॅम बॉम्बे हादेखील सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे.