मुंबई – कंटेंट क्वीन एकता कपूर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी “उडता पंजाब’ आणि “लुटेरा’ यासारखे सुपरहिट चित्रपट साकारले आहेत. ही जोडी पुन्हा एकदा एकत्रित आली असून ते “दोबारा’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिका साकारत आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची एक झलक शेअर करत एक मजेशीर टीझर प्रदर्शित केला आहे, ज्यात तापसी आणि अनुराग दोघेही दिसत आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे, “दोबारा’ची निर्मिती कल्ट मूव्हिज द्वारा करण्यात येत असून जो एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सच्या अंतर्गत एक नवीन डिव्हिजन आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणाले, “दोबारा’मधून आम्ही चाहत्यांसमोर एक नवीन कथा सादर करणार असून यासाठी मी खूप उत्साहित आहे. तापसीसोबत हा माझा तिसरा चित्रपट आहे.
या चित्रपटात थ्रिलर्स एका नवीन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दुसरीकडे अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली, या चित्रपटात एका अनोख्या पद्धतीचा थ्रिलर चाहत्यांना अनुभवण्यास मिळणार आहे. यापूर्वी “मनमर्जिया’ आणि “बदला’ या दोन चित्रपटात अनुराग यांच्यासोबत काम केलेले आहे. यामुळे या चित्रपटाकडूनही मला खूप अपेक्षा असल्याचे तापसीने सांगितले.