Kamal Haasan । अभिनेता कमळ हसन यांचे तमिळ चित्रपट चाहत्यांसह हिंदी चित्रपट चाहते मोठ्या प्रमाणात आहे. कमल हसन यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मागील वर्षी विक्रम चांगली कमाई केली.
लवकरच त्यांचा इंडियन २ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.कमल हसन यांचा अध्यात्मिक दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. अशात इंडियन २ चित्रपटावरून आत चाहते त्यांच्या अध्यात्मिक दृष्टिकोन नेमका कोणता आहे. ते कोणत्या देवाची पूजा करतात असा प्रश्न सोशल मीडियावर विचारत आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर असाही प्रश्न विचारला जात आहे की, ते नास्तिक आहे की आस्तिक आहे ? कोणी त्यांना हिंदू तर कोणी मुस्लिम मानतात. कमल यांचा जन्म १९५२ मध्ये एका तमिळ ब्राह्मण अयंगर कुटूंबात झाला. त्यांचे पूर्वी नाव पार्थसारथी होते वृत्तानुसार, कमल हसनचे आधी नाव पार्थसारथी होते जे त्याच नावाच्या देवतेच्या नावावरून ठेवण्यात आले होते.
पण नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचे स्वातंत्र्यसैनिक मित्र याकुब हसन यांच्या नावावरून त्यांचे नाव बदलून कमल हासन असे ठेवले. कमल हसनचे वडील देखील स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी याकुब हासनसोबत तुरुंगात दिवस घालवले. तथापि, हासन यांनी स्पष्ट केले की कमल त्यांच्या नावाचा कमल हासन म्हणजे कमळाचे फूल आणि हासन हा संस्कृत शब्द विनोदावरून आला आहे.
2015 मध्ये कमल हसन यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांनी स्वतःबद्दल एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते की ते नास्तिक नाहीत तर ‘बुद्धिवादी’ आहेत. ते म्हणाले होते, “माझ्या तर्कशुद्ध असण्यावर लोकांनी टीका करावी असे मला वाटत नाही.” एका बाजूला तुम्ही मंत्र ऐकता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही इतर धर्माचे भजन ऐकता, ही सहिष्णुता आहे. मी नास्तिक नाही. मी फक्त ‘बुद्धिवादी’ आहे.