‘तालिबानी नेते पाकिस्थानात शिकले; आम्ही तालिबानसाठी सर्वकाही केल’; पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

कराची –  तालिबान्यांनी वाऱ्याच्या वेगानं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला हे संपूर्ण जग आज पाहत आहे. याचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात.  पाकिस्तानकडून तालिबानी दहशतवाद्यांना सर्वाधिक समर्थन  मिळत असल्याची चर्चा आहे. तसेच पाकिस्तानकडून सातत्याने तालिबान्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांचं कौतुक करणारी विधाने केली आहे.

यातच पुन्हा एकदा पाकिस्थानमधील इमरान खान सरकारमधले मंत्री शेख राशीद  यांनी तालिबानी दहशतवाद्यांना सर्वाधिक समर्थन हे पाकिस्तानकडून मिळत असल्याचे म्हंटले आहे.

ते म्हणाले की,’पाकिस्थानने बरीच वर्षे तालिबानी नेत्यांना संरक्षण दिलेलं आहे. आमच्याकडे ते शरणार्थी म्हणून आले होते. त्यांनी इथेच शिक्षण घेतलं आणि इथेच आपलं घर वसवलं. आम्ही तालिबानसाठी सर्वकाही केल. ते पुढे म्हणाले, तालिबानी नेत्यांची पाठराखण करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.