काबूल – अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीने महिलांना विद्यापीठात शिकण्यावर बंदी घातली आहे. त्याविरोधात संताप व्यक्त करताना, काही महिन्यांपूर्वी एका प्राध्यापकाने शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे टेलिव्हिजनवर सर्वांसमक्ष फाडली होती. या प्राध्यापकाला शोधून तालिबानने आपल्या ताब्यात घेतले आहे आणि त्याला मारहाण करण्यात येत आहे. ही माहिती प्राध्यापकाच्या मित्राने दिली आहे.
ज्येष्ठ पत्रकारिता व्याख्याता इस्माईल मशाल यांनी डिसेंबरमध्ये महिलांचे उच्च शिक्षण संपवणाऱ्या वटहुकुमाचा निषेध करत टीव्हीवरील पदवी प्रमाणपत्रे फाडून तुफान गोंधळ माजवला होता. इस्लामिक अमिरातीच्या सदस्यांनी मशालला निर्दयीपणे मारहाण केली आणि अतिशय अनादरपूर्ण रीतीने फरपटत नेले, असे माशालचे सहकारी फरीद अहमद फाजली यांनी सांगितले.
दरम्यान, तालिबानच्या एका अधिकाऱ्याने अटकेला दुजोरा दिला आहे. माहिती आणि संस्कृती मंत्रालयाचे संचालक अब्दुल हक हम्माद यांनी ट्विट केले की, “शिक्षक मशालने काही काळ यंत्रणेविरुद्ध प्रक्षोभक कृती केली होती. म्हणून सुरक्षा यंत्रणांनी त्याला चौकशीसाठी नेले.
FAA Recruitment Scam : जम्मू-काश्मिरात CBI चे 37 ठिकाणी छापे
काबुलच्या तीन विद्यापीठांमध्ये एक दशकाहून अधिक काळ व्याख्याता असलेल्या मशालला “कोणताही गुन्हा केलेला नसतानाही गुरुवारी ताब्यात घेण्यात आले, असे फाजली म्हणाले. मशाल हा स्त्री-पुरुषांना मोफत पुस्तके देत होता. आता तो अजूनही नजरकैदेत आहे आणि त्याला कुठे ठेवले आहे हे कोणालाही माहित नाही.