रांजणगाव – पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी महत्वाचं देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी स्वाती दत्तात्रय पाचुंदकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. रांजणगाव गणपती देवस्थानच्या इतिहासात सन 1941 नंतर प्रथमच स्वाती पाचुंदकर यांची महिला अध्यक्ष म्हणुन पहिल्यांदाच निवड झाली आहे. देवस्थानच्या इतर चार सहकाऱ्यांनी पुढील पाच वर्षांसाठी स्वाती पाचुंदकर यांनाच बिनविरोध अध्यक्ष म्हणुन नियुक्त केले असल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गुरुवार (दि 19 )विश्वस्त मंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत मुख्य विश्वस्तपदी ओंकार नितीन देव यांची तर अध्यक्षपदी स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्षपदी संदीप दौंडकर, सचिवपदी तुषार पाचुंदकर आणि खजिनदारपदी विजय देव यांची निवड करण्यात आली. या सर्वच निवडी बिनविरोध पार पडल्या. या निवडीनंतर नूतन अध्यक्ष, मुख्य विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महागणपती मंदिरात आरती करण्यात आली. तसेच ग्रामस्थांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.