बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. बॉलीवूडशी संबंधित बऱ्याच जणांनी या इंडस्ट्रीतील नेपोटिझमला लक्ष्य केले आहे. सोशल मीडियावर #JusticeForSushantSinghRajput चे हॅशटॅग बऱ्यापैकी ट्रेंड होत आहे. अनेक ट्विटर यूजर्स करण जोहर आणि आलिया भट्ट यांना फिल्म इंडस्ट्रीत नेपोटिझम प्रोत्साहन देण्यासाठी दोष ठरवित आहेत. त्याचवेळी अभिनेत्री स्वरा भास्कर ही करण जोहर आणि आलिया भट्टच्या समर्थनार्थ पुढे आली आहे.
स्वराने आपल्या ट्विटरमध्ये लिहिले की, “भारताच्या काही भागांत ट्विटरवर करण जोहर आणि आलिया भट्ट यांना सुशांतच्या आत्महत्येसाठी दोषी ठरवित आहे, ते ही एका चॅट शोमध्ये खेळले गेलेल्या एका खेळामुळे (हे त्या लोकांसाठी ज्यांनी बॉलीवूडच्या नेपोटिझमचा गैरवापर करीत आहेत). हा मूर्खपणा आणि ढोंगीपणाचा कळस आहे.
तिने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, सुशांतने कोणतीही नोट सोडली नाही. आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की त्याच्यासोबत नेमके काय झाले. त्यामुळे एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीच्या दुःखाचा उपयोग करत निराकरण करणे थांबविले पाहिजे. त्याने एक नोट सोडली नाही! त्याला याबद्दल बोलण्याची इच्छा नव्हती. तो आता गेला आहे. त्याला शांती आणि त्याच्या कुटुंबयीांना सुरक्षितता द्या, असे तिने म्हटले आहे.