Asaduddin Owaisi : तेलंगणामध्ये या महिन्याच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रचार करताना दिसून येत आहेत. यावेळी तेलंगणातही ओबीसी राजकारण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे सांगितले की, तेलंगणात भाजपचे मागास वर्गीयातून येणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून निवडण्यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. असे म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला असून त्यांनी पंतप्रधानांवर यावेळी सडकून टीका केली आहे.
PM is appealing for votes on caste identity, but does not want to do justice to OBCs:
1. Promises to remove reservations for backward Muslims
2. Did not remove 50% ceiling on reservations
3. Opposes increasing 27% OBC quotaWhen I say that Muslims are underrepresented in… pic.twitter.com/hGcbXZ7QV2
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) November 7, 2023
असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधानांवर टीका करताना, पंतप्रधान जातीच्या आधारावर मतांचे आवाहन करत आहेत. पण ओबीसींना न्याय द्यायचा नाही. हैदराबादचे खासदार असणारे ओवैसी यांनी यावेळी तीन मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी मागास मुस्लिमांचे आरक्षण संपवण्याचे आश्वासन दिले होते. आरक्षणावरील 50% मर्यादा हटवली नाही आणि OBC कोटा 27% ने वाढवण्यास विरोध केला. ताईच पुढे बोलताना त्यांनी,”भारतीय राजकारणात मुस्लिमांचे प्रतिनिधित्व कमी आहे, म्हणून मला देशद्रोही आणि जातीयवादी म्हटले जाते. मोदी हतबल आहेत आणि आता ते दिसून येत आहे” असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधानांनी हैदराबादच्या लाल बहादूर शास्त्री स्टेडियममध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यानंतर त्यांनी ट्विटरवर लिहिले होते,”2013 मध्ये येथे झालेली माझी रॅली मी कधीही विसरू शकत नाही. कारण ‘त्यावेळी देशात ओबीसी पंतप्रधान निवडण्याचा प्रवास सुरू झाला होता. आज, मागास समाजातून आलेल्या तेलंगणाचा भाजपचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी काउंटडाऊन या ठिकाणाहून सुरू होत आहे, असे म्हटले होते.