#LIVE: सभांचा खर्च मोजण्यापेक्षा पाच वर्षात मारलेल्या थापा मोजा – राज ठाकरे

सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेत आहेत. त्यांनी यापूर्वी नांदेड येथील सभेतून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवत नसले तरी भाजप विरोधात त्यांनी कंबर कसली आहे. आज सोलापुरात बोलताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींना नोटाबंदीचा झटका आला, त्याचा परिणाम काय झाला? देशातील साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असल्याचे ठाकरे म्हणाले.

निवडणूक म्हणजे तुमच्या ५ वर्षं निघून जातात, आणि अशा वेळेला सत्ताधारी तुमच्यासमोर येऊन खोटं बोलतात, तुम्हाला फसवतात आणि हे का होतं कारण निवडणूक हा विषय आपण गांभीर्याने घेतच नाही. आपण हुरळून जाऊन मतदान करतो आणि पुढे घडतं काय तर गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ वर्षांपूर्वी जी दाखवलेली स्वप्न आहेत त्याविषयी बोलत नाहीयेत तर बोलत काय आहेत तर पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांच्या जीवावर मतं मागत आहेत, ऐअरस्ट्राइकच्या जीवावर मतं मागत आहेत?, असा आरोप राज ठाकरेंनी केला.

भाषणातील ठळक मुद्दे 

  • मोदी शहिदांच्या नावावर मतं मागतायेत
  • मी एकही उमेदवार दिलेला नसताना फिरतोय, हे लोक दर पाच वर्षांनीच तुम्हाला भेटतात, वाट्टेल त्या थापा मारयाच्या, खोटं बोलायचं, तुम्ही मतदान करता, पण पदरी काय पडतं?
  • अगोदरचे वाईट सांगून हे (भाजप) आले, हे त्यांच्यापेक्षा वाईट निघाले, माझ्या सभांचा खर्च कसा मोजायचा हा प्रश्न भाजपला पडलाय
  • महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांमध्ये जर स्थानिक लोकांनाच फक्त प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच नाही. आज ग्रामीण महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार बसला आहे. आणि आपण सगळे जातीच्या चर्चांमध्ये अडकलोय. मुळात सरकारी नोकऱ्या राहिल्यात किती? जातीवरून मतं मिळवण्यासाठी आरक्षणाची आमिष दाखवत आहेत

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.