मुंबई – प्रख्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत त्याच्या आत्महत्या नंतर तो मुंबईतील ज्या फ्लॅटमध्ये राहत होता. तो अडीच वर्षे रिकामाच होता पण अखेर या फ्लॅटला भाडे करून मिळाला आहे. मासिक पाच लाख रुपये भाडे आणि तीस लाख रुपये डिपॉझिट या शर्तीवर हा फ्लॅट भाड्याने देण्यात आला आहे. अडीच वर्षांपूर्वी सुशांत सिंग राजपूतचा या फ्लॅटमध्येच मृत्यू झाला होता त्याच्या मृत्यूच्या अजूनही चौकशी सुरू आहे. बाबतची पोलिसांची चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो फ्लॅट मालकाच्या ताब्यात देण्यात आला होता.
त्यानंतर मालकांनी हा फ्लॅट भाड्याने द्यावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते, पण कोणीही हा फ्लॅट घेण्यास तयार नव्हते मुंबईतील रिअल इस्टेट ब्रोकर रफिक मर्चंट यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आता या फ्लॅटला एक भाडेकरू मिळाला आहे. या फ्लॅटला भाडे करून मिळावा यासाठी रफिक मर्चंटही गेले दोन महिने प्रयत्न करत होते. जाहिरातीच्या सर्व माध्यमांचा वापर करून त्यांनी जाहिरातही केली होती.
त्यांच्याकडे विचारणाही होत होती पण जेव्हा हा या फ्लॅटमध्ये सुशांत सिंगचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात असे तेव्हा अनेक लोकांनी आम्हाला रस नाही असे रफिक त्यांना कळवले होते हा फ्लॅट चित्रपटसृष्टीची संबंधित कोणालाही भाड्याने दिला जाऊ नये अशी मालकांची इच्छा होती आता ज्याने हा फ्लॅट भाड्याने घेण्याबाबत करार केला आहे.
तो एक अनिवासी भारतीय आहे सुशांत ज्या फ्लॅटमध्ये राहत होता तो समुद्रकिनाऱ्याला असून या फ्लॅटमध्ये चार मोठ्या रूम आणि एक मोठा हॉल आहे. सुशांत जेव्हा या फ्लॅटमध्ये राहत होता तेव्हा तो मालकाला या फ्लॅटचे चार लाख 51 हजार भाडे देत होता. जून 2020 रोजी याच फ्लॅटमध्ये सुशांत सिंगचा मृतदेह सापडला होता स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हे प्रकरण सीबीआय कडे तपासासाठी सोपवण्यात आले आहे.