नवी दिल्ली : भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याचे तब्बल ७ दशकानंतर मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आज सकाळीच आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना १० किलोमीटर पसरलेल्या भागात सोडण्यात येणार आहे. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि इतर मंडळी उपस्थित असणार आहे.
देशात आणण्यात आलेल्या चित्त्यांसाठी खास विमानाची सोया करण्यात आली होती. या विमानामध्ये विशेष सुविधा करण्यात आली. चित्यांना सुरक्षित बॉक्समधून विमानाने भारतात आणले. त्यांच्यासोबत नामिबियाच्या चित्ता संवर्धन विभागाचं एक पथकही भारतात पोहोचले आहे.
#WATCH | Madhya Pradesh: Earlier visuals of the 8 cheetahs from Namibia being brought out of the special chartered cargo flight that landed in Gwalior this morning.
Indian Air Force choppers,carrying the felines, are enroute Kuno National Park where they’ll be reintroduced today pic.twitter.com/R2UV36N8E1
— ANI (@ANI) September 17, 2022
चित्त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे. शुक्रवारी नामिबियाहून निघालेले विशेष विमान शनिवारी सकाळी मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर विमानतळावर पोहोचले.
ग्वाल्हेरहून चित्त्यांना हेलिकॉप्टरद्वारे कुनो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये आणण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या चित्त्यांना अभयारण्यातील त्यांच्या विशेष अधिवासात सोडण्यात येणार आहे. 1952 साली नामशेष झालेला चित्ता हा प्राणी अखेर 70 वर्षानंतर भारतात परतला आहे. आता या आफ्रिकन चित्त्यांना भारतातील हवामानाशी जुळवून घ्यावे लागणार आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे.