मुंबई – बॉलिवूडचा अभिनेता सनी देओलचा मुलगा करण द्रिशा आचार्यबरोबर विवाहबंधनात अडकला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाचे विधी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अखेर त्यांचा विवाह सोहळा आज संपन्न झाला आहे. या विवाह सोहळ्यातील वधू आणि वराचा लुक विशेष चर्चेत आला आहे.
लग्नात करणने क्रीम रंगाची शेरवानी आणि त्याला मॅचिंग अशी पगडी घातली आहे. तर द्रिशाने लाल रंगाच्या लेहंगा घातला आहे. या लुकमध्ये दोघेही सुंदर दिसत आहे. सध्या या दोघांच्या लग्नाचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नुकताच करणच्या लग्नातील वरातीचा व्हिडिओही समोर आला आहे.या व्हिडीओमध्ये करण घोड्यावरुन लग्नमंडपात जाताना दिसतो. या वरातीमध्ये धर्मेंद्र आणि सनीही आनंदाने नाचताना दिसत आहेत. या वरातीतील मंडळींच्या पारंपरिक लूकनेही लक्ष वेधलं आहे. देओल कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने केलेल्या या लग्नसोहळ्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
कोण आहे द्रिशा आचार्य?
सनी देओलची होणारी सून द्रिशाने अद्याप चित्रपटात काम केलेले नाही. मात्र ती चित्रपटसृष्टीतील कुटुंबाचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. द्रिशा प्रसिद्ध चित्रपटनिर्माते बिमल रॉय यांची पणती आहे. द्रिशा एका ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचे सांगितले जाते.