पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर भारतातील दानापूर, हजरत निजामुद्दीन तसेच नागपूरसाठी उन्हाळी विशेष ७० ट्रेन्स धावणार आहेत.
यात पुणे-दानापूर (ट्रेन क्रमांक ०१४७१) सुपरफास्ट द्वीसाप्ताहिक विशेष गाडी दि. ११ आणि १४ एप्रिल तसेच २ आणि ५ मे (गुरुवार,रविवार) रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. तर, दानापूर-पुणे सुपरफास्ट (ट्रेन क्रमांक ०१४७२) ही द्वी साप्ताहिक विशेष गाडी दि. १२ आणि १५ तसेच ३ आणि ६ मे (शुक्रवार,सोमवार) रोजी दानापूर येथून दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुटणार आहे.
पुणे-नागपूर-पुणे या मार्गावर विशेष ३८ विशेष ट्रेन धावतील. दि. १४ एप्रिल ते १६ जून दरम्यान ही ट्रेन पुण्याहून दर मंगळवार, रविवार पुण्याहून दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी ही गाडी सुटणार आहे. तर नागपूर-पुणे ही सुपरफास्ट द्वि साप्ताहिक विशेष गाडीच्या दि. १३ एप्रिल ते १५ जून या दरम्यान सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी गाडी सुटणार आहे.
तर, पुणे-हजरत निजामुद्दीन (ट्रेन क्रमांक ०१४९१) ही साप्ताहिक सुपरफास्ट विशेष दि. १२ एप्रिल ते २८ जून या दरम्यान धावणार आहे. दर शुक्रवारी पुण्याहून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटणार आहे. तर, हजरत निजामुद्दीन-पुणे (ट्रेन क्रमांक ०१४९२) ही साप्ताहिक सुपर फास्ट विशेष १३ एप्रिल ते २९ जून या दरम्यान दर शनिवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे.