पिंपरी – चौदा वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांबेगाव येथे रविवारी (दि. 19) रात्री घडली.
काजल खातीम महंमद अफरोज मन्सुरी (वय 14, रा. रसिकवाडी, जांबेगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास काजल हिने राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी तिच्या पालकांकडे चौकशी केली. मात्र काजल हिने आत्महत्या करण्यासारखे कोणतेही कारण घडले नसल्याचे सांगितले.
हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.