राजगुरूनगर – करोनाबाधित असलेल्या 60 वर्षीय व्यक्तीने हाताची नस कापून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना राजगुरूनगर शहरात घडली.
मयत व त्यांच्या पत्नीला करोनाचा संसर्ग झाला होता. दोघेही पुण्यातील खासगी रुग्णालयात 15 दिवस उपचार घेऊन चारच दिवसांपूर्वी घरी आले होते. मात्र दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती रुग्णालयात अवास्तव खर्च झाल्यावर आणि एक अहवाल निगेटिव्ह आल्यावर ते घरी राहून काळजी घेत होते.
शुक्रवारी (दि 7) पुन्हा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज येणार होता. त्रास होत असल्याने घरी डॉक्टर यायला धजत नव्हते. त्रास कमी होत नसल्याने शुक्रवारी रात्री त्यांनी आपल्या खोलीत हाताची नस धारदार सुरीने कापून आत्महत्या केली. शनिवारी (दि. 8) सकाळी मुलगा त्यांना उठवायला गेल्यावर वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.