मुंबई – इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती अलीकडेच कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. यादरम्यान सुधा मूर्ती यांनी खुलासा केला की, दिवंगत अभिनेते दिलीप कुमार लहान असताना माझा सर्वात लोकप्रिय अभिनेता होता. त्याचवेळी सुधा मूर्ती यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे कौतुक केले.
आवडत्या हिरोबद्दल बोलताना सुधा मूर्ती म्हणाल्या, ‘मी लहान असताना माझा हिरो दिलीप कुमार होता. त्याचा अभिनय मला फार आवडत असे. त्यानंतर आणखी एक अभिनेता आहे. जो त्याच भावनांनी अभिनय करू शकतो. तो म्हणजे शाहरुख खान.
सुधा मूर्ती यांनी शाहरुखची तुलना दिलीप कुमारशी केली, म्हणाल्या, ‘मी जेव्हा ‘वीर-जारा’ चित्रपट पाहिला तेव्हा मी माझ्या मुलीला सांगितले की दिलीप कुमार आता असते तर त्यांनी ‘वीर-जारा’ केला असता आणि आता शाहरुख खान त्याची जागा घेत आहे. . बॉलीवूडमध्ये फक्त तोच हे करू शकतो.