सोलापूर – श्री विठ्ठल हे वारकऱ्यांचे आराध्य दैवत आहे. लाखो वारकरी या विठुरायाच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूरला जात असतात. पांडुरंगाचं दर्शन घेऊन शक्य असेल तेवढी देणगी विठुरायाचरणी अर्पण करतात. एका आजीबाईने तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी विठुरायाच्या चरणी अर्पण केली आहे. विशेष म्हणजे या दानशूर आजीबाईने कोणाचीही मदत न घेता स्वत:च्या कष्टाने केलेल्या कमाईतून ही देणगी दिली आहे.
फुलाबाई यांची विठुरायावर अपार श्रद्धा आहे. त्यांना अनेक वर्षांपासून विठ्ठलाला देणगी देण्याची इच्छा होती. तसा मनोदय त्यांनी आपल्या मुलांजवळ बोलून ही दाखवला होता. पण देणगीसाठी कोणाकडे पैसे मागणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते.
फुलाबाई असे या दानशूर आजीबाईचे नाव आहे. त्या सांगोला तालुक्यातील शिवणे येथील आहेत. आजीबाईने काबाड कष्ट करून ही देणगी दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार, फुलाबाई यांना विठ्ठलाला देणगी देण्याची खुप इच्छा होती. शिवाय ती देणगी त्यांना स्वत:च्या कष्टाच्या पैशातून द्यायची होती. त्यांनी त्यासाठी पाच वर्ष खुप कष्ट केले. शेळ्या, मेढ्या राखल्या. त्यानंतर त्यांनी त्या शेळ्या विकून आणि सोन्याचे दागिने विकून विठुरायाचरणी 1,11,111 रुपयांची देणगी अर्पण केली आहे. दानशूर फुलाबाई यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.