नगर -मुळाडॅम येथील 33 के.व्ही विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महावितरणकडून शनिवारी (दि.4) रोजी सकाळी 11 वाजता ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरासह उपनगरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे मुळा नगर, विळद पंपींग स्टेशन येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
शनिवारी बोल्हेगाव, नागापून, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकूंदनगर, तसेच स्टेशन रोड, सारसनगर, विनायक नगर, मुकूंदनगर, केडगाव, कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तसेच रविवारी मंगलगेट, झेंडीगेट, दाळमंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलणी, सिव्हील हाड को, प्रेमदान हाडको, म्युनिसिपल हाडको या परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.
सोमवारी पाणीपुरवठा होवू घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास सर्जेपुरा, तोफखाणा, सिध्दार्थनगर, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रोड, कापडबाजार, माळीवाडा भागात पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवारी (दि.7) पाणी पुरवठा होणार आहे. शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले अशा भागात पालिकेला नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.