दिलबर गर्ल नोरा फतेही सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. नोरा आपल्या चाहत्यांशी सतत आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नोराने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
View this post on Instagram
या फोटोत ती जरा विचित्र अशा ड्रेसिंगमध्ये दिसत आहे. हे फोटो पहिल्यानंतर चाहते नोराच्या फॅशन सेन्सवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
View this post on Instagram
नोराने केलेल्या या लेटेस्ट फोटोशूटमधील एका फोटोत ती मेहरून कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने सन ग्लासेस आणि हिरव्या रंगाची टोपीही परिधान केलेली आहे. अन्य एका फोटोत नोरा ही प्रिंटेड हाई स्लिट ड्रेसमध्ये खूपच हॉट अंदाजात दिसत आहे.
View this post on Instagram
नोराच्या या फोटोंवर अनेक यूजर्सने विविध कमेंट केल्या आहेत. तसेच काही जणांनी तिची तुलना रणवीर सिंह याच्यासोबत केली आहे. एका यूजरने लिहिले की, रणवीरला नोरा देत आहे टक्कर!’ अन्य एकाने पोस्ट केली की, रणवीरही नोरापेक्षा मागे राहिला आहे.
View this post on Instagram
नोरा फतेहीचे हे फोटो एका थीम सूटचा भाग आहे. हे फोटो एका इंटरनॅशनल फोटोग्राफरने क्लिक केले आहेत. या फोटोतील नोराचे पोज खूपच जबरदस्त आहेत. नोराच्या या फोटोंमध्ये अनेक रंग आणि पॅटर्न्स पाहण्यास मिळतात.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास नोरा लवकरच अभिषेक दुधैया यांच्या “भुज ः द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात झळकणार आहे. तसेच नोरा फतेहीने अनेक हिट गाण्यांमध्ये आपल्या डान्सचा जलवा दाखविला आहे.
View this post on Instagram