धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत इंग्रजी शिक्षण

पुणे – आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना राज्यातील धनगर समाजासाठी लागू करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकीत निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाणार आहे. या योजनेची यंदाच्या 2019-10 या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याअंतर्गत दरवर्षी साडे पाच हजार विद्यार्थ्यांना पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाणार आहे. त्याकरिता 50 कोटी निधी खर्च होणार असल्याचा अंदाज आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली धनगर आरक्षणासंदर्भात मार्च महिन्यात बैठक पार पडली. आदिवासी योजनांच्या धर्तीवर एकून 13 योजना धनगर सामाजाला लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात
आला.

या योजनेंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, ट्यूशन फी, सुरक्षा अनामत रक्‍कम, रेनकोट शिक्षण शुल्क या सर्व रकमा समाजकल्याण विभागाकडून संबंधित शाळेला अदा करावयाच्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here